पिंपरी : ‘शासन आपल्या दारी’चा 86 हजार जणांना लाभ | पुढारी

पिंपरी : ‘शासन आपल्या दारी’चा 86 हजार जणांना लाभ

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड, पुणे व ग्रामीण भागातील झालेल्या ‘शासन आपली दारी’ उपक्रमांतर्गत आतापर्यंत 2 लाख 86 हजार 287 नागरिकांनी लाभ घेतला आहे. तर, त्यापैकी आतापर्यंत थेट 48 कोटींचे लाभ वितरित करण्यात आले आहे.
थेरगाव येथील पद्मजी पेपर मिलजवळील मैदानात शुक्रवारी (दि.16) ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम झाला. त्यात ही माहिती देण्यात आली. यानिमित्त विविध स्टॉल उभारण्यात आले होते.

तेथे उत्पन्नाचा दाखला, नवीन मतदार नोंदणी, रहिवासी दाखला, सातबारा, आठ अ, हवेली तालुक्यातील रहिवाश्याकरिता जातीचा दाखला, वय, अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला, 33 टक्के महिला आरक्षण दाखला, ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला काढून देणे, आधार कार्डमधील नवीन दुरुस्ती व अद्यावत करणे, मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करणे, रेशनकार्डवरील नाव कमी करणे, नाव वाढविणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचा दाखला, नॉन क्रिमीलिअर, पोस्ट ऑफिसचे प्रमाणपत्र, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचा दाखला काढून देण्याचे स्टॉल होते.

या दाखल्यासाठी तसेच, विविध लाभांसाठी नागरिकांनी सकाळी दहा वाजल्यापासून येथे गर्दी गेली होती. शासनाच्या तसेच, महापालिकेच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप आणि विविध दाखल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. पालिकेच्या समाज विकास विभागाच्या कल्याणकारी योजनेतील लाभार्थ्यांना लाभांचे वितरण करण्यात आले.

घरकुल योजनेतील सदनिकांचे वाटप करण्यात आले. शहरातील हे पहिल्या टप्प्यातील शिबिर होते. पुढे दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील शिबिर आयोजित केले जाणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात आतापर्यंत राज्यभरात 104 शिबिर घेण्यात आले आहेत. त्याचा लाभ सुमारे 35 लाख नागरिकांनी घेतला आहे. त्यात तब्बल 286 कोटींचा लाभ नागरिकांना देण्यात आला आहे.

हेही वाचा

शबरी घरकुल योजनेची माहिती हवी आहे, मंत्री गावितांनी घेतली कर्मचाऱ्याची परीक्षा

Adipurush : प्रभासच्या आदिपुरुषला संमिश्र प्रतिसाद, पहिल्या दिवशी कोटींची कमाई

Back to top button