‘त्या’ वादग्रस्त कारवाईची टीम आज पुण्यात | पुढारी

'त्या' वादग्रस्त कारवाईची टीम आज पुण्यात

पुणे : राज्यात खरीप हंगामाच्या तोंडावर भेसळखोरांना अटकाव घालण्यासाठी अकोला जिल्ह्यात कृषी विभागाकडून काही खासगी व्यक्तींसह केलेली कारवाई वादाची ठरलेली आहे. पावसाळी अधिवेशनात वादंग उठण्याची शक्यता असून, बी-बियाणे, खते, औषधांचे नमुने प्रयोगशाळांमध्ये तपासणीस गेले का आणि अन्य माहितींवर संबंधित अधिकार्‍यांच्या विशेष पथकाच्या ’टीम’ला कृषी आयुक्तालयात शनिवारी (दि. 17) अहवाल अंतिम करण्यासाठी पाचारण करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सुमारे 40 हून अधिक तंत्र अधिकारी व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, याबाबत कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची भेट होऊ शकली नाही, तर विकास पाटील यांच्यांशी संपर्क होऊ न शकल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.

हे ही वाचा : 

सातारा : जेवणाच्या पार्टीत युवकाचा खून

Ashadhi wari 2023 : तुकोबारायांचे वरवंडला दिमाखात स्वागत

Back to top button