पिके जळाल्याने डोळे पांढरे!

पिके जळाल्याने डोळे पांढरे!
Published on
Updated on

अनिल तावरे : 

सांगवी : गेले वर्षभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली उसाची पिके पाण्याअभावी जळून जाऊ लागली आहेत. धरणांतील पाण्याला निरा नदीच्या प्रदूषणाची किनार असल्याने ही मानवनिर्मति परिस्थिती केवळ राजकारणात एकमेकांना पांघरुण घालण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न सांगवी भागातील शेतकर्‍यांच्या मुळावर उठला असल्याचा आरोप शेतकर्‍यांमधून होतो आहे. या राजकारणाच्या भानगडीने शेतकर्‍यावर शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळून जाण्यामुळे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.  एकरी उसाचे उत्पन्न घटून शेतकरी कर्जबाजारी होणार आहे.

शेतकरी कर्जबाजारी होणार असला तरी राजकीय नेत्यांना या गंभीर प्रश्नावर कोणतेच सोयरसुतक नसल्याचे उघडकीस येऊ लागले आहे. या महत्त्वाच्या प्रश्नावर उपाययोजना केल्या जात नसल्याने भविष्यात येणार्‍या निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी जलसंपदा विभागाच्या वतीने शेतीच्या पाण्याचे योग्य नियोजन करून शेवटच्या घटकांपर्यंत शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले होते. गेली अनेक वर्षे निरा नदीच्या प्रदूषणाची समस्या निर्माण होत असताना कोणीही ती गांभीर्याने घेताना दिसत नव्हते. यंदा प्रथमच निरा नदीच्या प्रदूषणाची तीता जास्त वाढल्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने लक्ष केंद्रित केले गेले आहे. 8पान 2 वर

वितरिका 18 वरील राजकारण्यांचे काही खरे नाही
निरा डाव्या कालव्याची वितरिका क्र. 18 ही माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील व जिल्हा परिषदेच्या दोन मतदारसंघांतील निर्णायक गावांतील वितरिका आहे, त्यामुळे सध्यातरी बहुतेक जण राजकीय नेत्यांवर चिडून आहेत. त्यामुळे भविष्यातील निवडणुकीत या गंभीर गोष्टीचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news