पुणे : वादग्रस्त पोस्ट, कमेंट केल्यास कारवाई ; पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांचा इशारा

पुणे : वादग्रस्त पोस्ट, कमेंट केल्यास कारवाई ; पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांचा इशारा

मंचर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त पोस्ट, कमेंट टाकून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मंचरचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिला. मंचर (ता. आंबेगाव) येथील नगरपंचायत हॉल येथे आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिस निरीक्षक सतीश होडगर बोलत होते. या वेळी मंचरचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, संजय थोरात, राजाराम बाणखेले, दत्ता गांजाळे, मीराताई बाणखेले, सतीश बेंडे पाटील, वसंतराव बाणखेले, संदीप बाणखेले, जे. के. थोरात, मंगेश बाणखेले, शशिकांत बढे, प्रवीण मोरडे, गणेश खानदेशे, जगदीश घिसे, विकास बाणखेले, स्वप्ना पिंगळे, कल्पेश बाणखेले, नवनाथ थोरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना अ‍ॅड. अविनाश रहाणे म्हणाले, चुकीचे काम करणार्‍यांचे समर्थन कुणीही करू नये. विधानसभा, लोकसभा, मंचर नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पार पडेपर्यंत मंचर पोलिस ठाण्याने दर दोन महिन्यांनी शांतता समितीची बैठक घ्यावी. त्या माध्यमातून समज-गैरसमज दूर होण्यासाठी मदत होईल.

या वेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात म्हणाले, मंचर शहरात सर्व जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहत असून, यापुढेही सामाजिक सलोखा राखून व समाजाप्रती आपले काहीतरी देणे आहे ही भावना मनात ठेवून सर्वांनी एकत्रित राहणे गरजेचे आहे.
या वेळी सुरेश भोर, दत्ता थोरात, संतोष खामकर, डी. के. वळसे पाटील, आशिष पुगलिया यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन पोलिस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे यांनी, तर आभार मंचरचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी केले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून काही तरुण तेढ निर्माण करण्यासाठी चुकीच्या पोस्ट किंवा स्टेटस ठेवत असतात. पोलिस प्रशासनाने अशा तरुणांना ताब्यात घेऊन तत्काळ कडक कारवाई करावी व त्यांना गंभीर शिक्षा होईल, अशी कलमे त्यांच्यावर लावावी. जेणेकरून इतर कोणी अशा प्रकारे पुन्हा गुन्हा करणार नाही.
               – राजू इनामदार, अध्यक्ष, आंबेगाव तालुका, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news