पुणे : आयसीसीआर राबविणार कल्चर कनेक्ट योजना !

पुणे : आयसीसीआर राबविणार कल्चर कनेक्ट योजना !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  परदेशातील विद्यार्थ्यांना भारताच्या बलस्थानांची माहिती देऊन त्यांच्या देशात त्यांनी भारताच्या बलस्थानांचा प्रसार आणि प्रचार करावा, यासाठी परदेशी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद अर्थात आयसीसीआर कल्चर कनेक्ट योजना राबविणार असल्याची माहिती माजी आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुध्दे यांनी दिली. पुण्यातील शैक्षणिक घडामोडींचे वार्तांकन करणार्‍या पत्रकारांनी दिल्लीतील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या. या वेळी 'आयसीसीआर' संस्थेत झालेल्या भेटीदरम्यान डॉ. सहस्रबुध्दे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

डॉ. सहस्रबुध्दे म्हणाले, आयसीसीआरची जगभरात 37 ठिकाणी सांस्कृतिक केंद्रे आहेत. कल्चर कनेक्टच्या माध्यमातून खादी कमिशन, आयुष मंत्रालय आणि टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याबरोबर चर्चा करून एक अशी योजना तयार केली आहे. परदेशी विद्यार्थी आपल्या देशात आल्यानंतर ते ज्या ठिकाणी शिकतात, त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करावा. त्या दिवशी त्यांनी एखादे चर्चासत्र घ्यावे आणि त्यांच्या देशात रोजगाराच्या, उद्योगाच्या काय संधी आहेत, याविषयी चर्चा करावी. त्यांची भाषा भारतीयांना ऑनलाइन, ऑफलाइन शिकवावी, यातूनच त्यांचे आणि भारतीयांचे संबंध दृढ होतील.

आपल्या देशात परदेशी भाषा शिकवण्याचा विषय आला, तर काही मोजक्याच भाषा शिकवण्यात येतात. उदा. : जर्मन, फ—ेंच, स्पॅनिश, जापनीज, चायनीज याच भाषा शिकवल्या जातात. परंतु, आपल्या शेजारील देशांमधील भाषा आपल्याला येत नाहीत. मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका आदी देशांमध्ये आवश्यक भाषा आपल्याकडे शिकवल्या जात नाहीत. त्यामुळे संबंधित देशांमधील विद्यापीठे आणि आपल्या देशातील विद्यापीठे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन संबंधित भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहित करतील. यामध्ये विद्यार्थ्यांनी ट्रान्सलेटर आणि साहित्यनिर्मितीचे कौशल्य मिळविणे गरजेचे असल्याचे सहस्रबुध्दे म्हणाले.

परदेशी नागरिकांची होणार गणना
देशात जी बलस्थाने आहेत त्यांच्यावर भर दिला, तर परदेशातील लोक त्या क्षेत्रांचा अभ्यास करण्यासाठी भारतात येतील. भारताने लोकांना ट्रेनिंग व्हिसा देणे गरजेचे आहे. भारतात विविध गोष्टींचे प्रशिक्षण घेण्यासाठी परदेशी लोक येतात. परंतु, ते टुरिस्ट व्हिसावरच राहतात. त्यामुळे त्यांची नोंद होत नाही. त्यांची नोंद झाली तर त्यांची गणना करता येईल. यासाठी आयसीसीआरची समिती काम करीत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news