येरवडा, विश्रांतवाडीत माउलींचा जयघोष; भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत | पुढारी

येरवडा, विश्रांतवाडीत माउलींचा जयघोष; भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत

येरवडा; पुढारी वृत्तसेवा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे विश्रांतवाडी, येरवडा येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. कळस येथे महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी दुपारी सव्वाबारा वाजता स्वागत स्वागत केले. फुलेनगर येथील दत्त मंदिरात माउलींना सावंत परिवाराच्या वतीने नैवेद्य दाखविण्यात आला. दुपारी दोन तास दत्त मंदिरात पालखी विसाव्यासाठी थांबली होती. या ठिकाणी हजारो भाविकांनी माउलींचे दर्शन घेतले.

वारकर्‍यांचे स्वागत करण्यासाठी, त्यांना अन्नदान करण्यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, मंडळे, प्रतिष्ठान यांनी रस्त्याच्या कडेला स्टॉल लावले होते. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वतीने वारकर्‍यांना अन्नदान करण्यात आले. आमदार सुनील टिंगरे यांनीदेखील वारकर्‍यांना खाऊ वाटप केले. माजी नगरसेविका रेखा टिंगरे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत टिंगरे यांनी कमल प्रतिष्ठान आणि भाजपच्या वतीने ज्यूस आणि औषध वाटप करण्यात आले. माजी नगरसेवक सतीश म्हस्के यांनी गुडदाणी आणि पाणी वाटप केले.

बाळकृष्ण पतसंस्थेच्या वतीने कुणाल टिंगरे आणि रेणुका चलवादी यांच्या वतीने वारकर्‍यांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
माता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने वारकर्‍यांना छत्री, बिस्कीट व पाणीवाटप करण्यात आले. माजी नगरसेवक अनिल टिंगरे, विशाल टिंगरे, जगदीश देशपांडे यांसह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. जंजिरे प्रतिष्ठानच्या वतीने चंद्रकांत जंजिरे, प्रा. शामा जाधव यांनी वारकर्‍यांसाठी वैद्यकीय सुविधा करून दिली होती.

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सुषमा अंधारे, सागर माळकर, आनंद गोयल यांनी पाणी, तसेच खाऊ वाटप केले. राहुल जाधव यांनी वारकर्‍यांच्या पायाची मसाज करून देणे, बॅगा शिवणे अशी सोय उपलब्ध करून दिली. येरवडा येथील शहादलबाबा चौकात शिवसेना माजी नगरसेवक संजय भोसले, ज्ञानेश्वर मोझे यांच्या वतीने वारकर्‍यांची सेवा करण्यात आली. दुपारी चार वाजता पालखी संगमवाडी येथे विसाव्यासाठी थांबली होती. याठिकाणी देखील हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. वारकर्‍यांच्या सोयीसाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभर नाष्टा, पाणी, आराम, जेवणाची सोय आंगण हॉटेलमध्ये गणेश बाबर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उपलब्ध करून दिली होती. या सेवेचा हजारो वारकर्‍यांनी लाभ घेतला.

हेही वाचा

पुण्यात मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची लागली वाट!

Jalgaon : परिविक्षाधीन तहसीलदारांना जेसीबीद्वारे चिरडण्याचा प्रयत्न; रावेर तालुक्यातील घटना

Back to top button