

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सन 2023-2028 या कालावधीकरिता संचालक मंडळाची निवडणूक बँकेचे अध्यक्ष विजय प्रकाश ढेरे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळात विजय ढेरे, अंकुश काकडे, प्रदीप मिसाळ, प्रसन्न जगताप, हेमंत जगताप, अजित खेसे, योगिराज खिलारे, रावसाहेब खंडागळे, सुधीर शेळके, राजन उडाने, युवराज खेडकर, रवींद्र रच्चा, उदय महाले, प्रमिला कोंढरे, हेमा खत्री यांचा समावेश आहे.
बँकेच्या 31 मार्च 2023 अखेर 251.14 कोटी रुपयांच्या ठेवी असून, 123.10 कोटी रुपयांची कर्जे वाटप करण्यात आली असून, बँकेचा एकत्रित व्यवसाय 374.24 कोटी रुपयांइतका झाला आहे. बँकेचा निव्वळ एनपीएचे प्रमाण शून्य टक्के आहे. तसेच बँकेला ढोबळ नफा 4.68 कोटींचा झाला आहे. सन 2021-22 या वैधानिक लेखापरीक्षणात बँकेस अ वर्ग प्राप्त झाला असून, सभासदांना 9 टक्के लाभांश वाटप करण्यात आले आहे. बँकेच्या निवडणुकीत जिल्हा उपनिबंधक संजय राऊत आणि उपनिबंधक नीलिमा पिंगळे यांचे सहकार्य लाभले.
पुणे मर्चंट्स को-ऑप. बँक ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व सुव्यवस्थापित बँकेचे सर्व निकष पूर्ण करीत असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने आमच्या बँकेला आणखी पाच शाखा सुरू करण्यास तत्त्वतः मान्यता दिली. त्यापैकी आंबेगाव बु., कोंढवे धावडे या दोन शाखा लवकरच कार्यान्वित होतील. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविला आहे.
– विजय ढेरे,
विद्यमान अध्यक्ष,
पुणे मर्चंट्स को-ऑप. बँक
हेही वाचा