पुणे : आमदार टिंगरे यांच्या निवेदनानंतर अखेर कारवाई | पुढारी

पुणे : आमदार टिंगरे यांच्या निवेदनानंतर अखेर कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा : येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये चालणार्‍या साउंडसिस्टिमवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. या वेळी गौरीशंकर कल्याण बंगाले, सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू, निलांजली सोसायटी येथील एलिफंट अ‍ॅण्ड को. रेस्टॉरन्ट अ‍ॅण्ड बारवर कारवाई करण्यात आली. या वेळी गुन्हे शाखेने 4 लाखांची साऊंड सिस्टिम जप्त केली. संबंधित हॉटेलवर पर्यावरण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नुकताच मतदारसंघातील अनध हॉटेल आणि बेकायदेशिररीत्या चालणार्‍या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार येरवडा पोलिस ठाण्याच्या परिसरात रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये चालणारी साउंड सिस्टिम पोलिसांनी जप्त केली.

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, अंमलदार अजय राणे, हनमंत कांबळे, अमेय रसाळ, अमित जमदाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

येरवडा कारागृहाच्या सीमा भिंतीलगतच्या ‘नो पार्किंग झोन’च्या निर्णयाला स्थगिती

केक कापताना बाहेर आली बत्तिशी!

कर्जत बाजार समिती : राम शिंदेंचा रोहित पवारांना धक्का

Back to top button