

तेल अवीव : कर्करोगावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा इस्रायलने केला आहे. जेरुसलेममधील हदासाह युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. जेरुसलेमच्या ऐन केरेमनी जाहीर केले आहे की मल्टिपल मायलोमा कॅन्सरच्या उपचारात अभूतपूर्व यश मिळाले आहे. हा दुसर्या क्रमांकाचा सर्वसामान्य हेमेटोलॉजिकल आजार आहे जो रक्ताच्या कर्करोगाचा दहावा हिस्सा आहे. तसेच प्रत्येक प्रकारच्या कर्करोगाचा तो एक टक्के भाग असतो. कर्करोगाला आजही एक जीवघेणा आजारच मानला जातो.
युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधील पोलिना स्टेपेंस्की यांनी सांगितले की 'सीएआर-टी ट्रिटमेंट'चे प्रभावशाली निष्कर्ष पाहून असे वाटते की कर्करोगाच्या रुग्णांचे आयुष्य आता आणखी वाढवता येऊ शकते. हे रुग्ण एक चांगले जीवन जगू शकतील. या नव्या उपचाराचे प्रयोग हॉस्पिटलच्या बोन-मॅरो ट्रान्सप्लांट आणि इम्युनोथेरेपी विभागात करण्यात आले आहेत. ही नवी उपचार पद्धत जेनेटिक इंजिनिअरिंगच्या तंत्रावर आधारित आहे. हे एक असे तंत्र आहे जे कर्करोगाच्या अशा रुग्णांसाठी प्रभावी आहे ज्यांचे आयुष्य काही वर्षांपूर्वी केवळ दोन वर्षांचेच सांगितले जात असे.
डॉक्टरांनी एआर-टी किंवा चिमेरिक अँटिजेन रिसेप्टर टी-सेल थेरेपी नावाच्या जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचा प्रयोग केला. हे तंत्र कर्करोगाला नष्ट करण्यासाठी रुग्णाची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करते. ऑन्कोलॉजिस्टनी म्हटले की हदासाहमध्ये उपचार केलेल्या 74 रुग्णांपैकी 90 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले. सीएआर-टी टेक्नॉलॉजी उपचाराला आणखी सोपे बनवू शकते. त्यामुळे कर्करोगावर प्रभावी उपचार करता येणे शक्य आहे. मल्टिपल मायलोमा हा बोनमॅरोचा एक विशिष्ट प्रकारचा कर्करोग आहे. तो सर्वसाधारणपणे कवटी, पेल्विस, फासळ्या आणि मणक्यासह शरीराच्या अनेक भागांना प्रभावित करतो.