Monsoon : मान्सून 48 तासांत महाराष्ट्र, गोव्यात | पुढारी

Monsoon : मान्सून 48 तासांत महाराष्ट्र, गोव्यात

पुणे, पुढारी वृत्तसेवा : Monsoon : राज्यातील कमाल तापमानाचा पारा कमी झाला आहे. आता मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वाढली आहे. येत्या 48 तासांत मान्सून गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 14 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह पाऊस हजेरी लावणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

राज्यात शनिवारी वर्धा येथे कमाल तापमानाचा पारा 42.8 अंश सेल्सिअसच्या आसपास होता; तर उर्वरित शहराचा तापमानाचा पारा 40 अंशांच्या आसपास राहिला. दरम्यान, पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा राहणार असला, तरी पावसाची हजेरी असणार आहे. पुणे शहर आणि आसपासच्या भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. Monsoon

Monsoon : ‘बिपरजॉय’ उत्तरेकडे सरकणार

अनुकूल स्थितीमुळे मान्सूनची आगेकूच सुरूच आहे. दरम्यान, अरबी समुद्रात तयार आलेले बिपरजॉय चक्रीवादळ पुढील 24 तासांत आणखी उत्तरेकडे सरकणार आहे.

मान्सून केरळमध्ये तब्बल 8 दिवस उशिरा दाखल झाला. मात्र, पोषक वातावरणामुळे मान्सूनचा पुढील प्रवास सुकर होत चालला आहे. सध्या मान्सूनने केरळचा उर्वरित भाग, कर्नाटकचा काही भाग, दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरातील काही भाग, पूर्वमध्य बंगाल, बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालच्या उपसागरातील बहुतांश भाग, पश्चिम बंगाल, सिक्कीमचा भाग व्यापला आहे. Monsoon

अरबी समुद्रात तयार झालेले बिपरजॉय चक्रीवादळ सध्या मध्य पूर्व अरबी समुद्रात असून पुढील 24 तासांत ते उत्तरेकडे, तर तीन दिवसांत आणखी उत्तरेकडील भागाकडे सरकणार आहे. त्यानंतर या चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. या शिवाय बंगालच्या उपसागरातील उत्तर पूर्व ते दक्षिण पूर्व बांगलादेश ते उत्तर म्यानमारच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो सध्या उत्तर पूर्व बंगालच्या उपसागरावर असून, त्याची तीव्रता कमी होणार आहे. Monsoon

हे ही वाचा :

Monsoon Updates | मान्सून गोव्याच्या वेशीवर! पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होणार

Weather Forecast : ‘बिपरजॉय’चा भारतीय किनारपट्टीवर थेट परिणाम नाही…वाचा ‘मान्सून’ची वाटचाल

Back to top button