मंचर : जनतेसाठी काम करणार्‍या माणसाला निवडून द्या : आ. शहाजी बापू पाटील

मंचर : जनतेसाठी काम करणार्‍या माणसाला निवडून द्या : आ. शहाजी बापू पाटील
Published on
Updated on

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मागील लोकसभा निवडणुकीत शिरूरमधून जनतेने भावनेच्या भरात अमोल कोल्हे यांना निवडून दिले. मात्र, ते मतदारसंघात फिरत नाहीत. त्यांना मतदारांची पर्वा नाही. याउलट माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील गेली चार वर्षे मतदारसंघात फिरत आहेत. विविध विकासकामे मार्गी लावत आहेत. या पुढील काळात जनतेसाठी काम करणार्‍या माणसाला निवडून द्या, असे आवाहन आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून व आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या मंचर शहरातील 26 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी आमदार शरद सोनवणे, सुनील बाणखेले, जयसिंगराव एरंडे, डॉ. ताराचंद कराळे, अरुण गिरे, सागर काजळे, योगेश बाणखेले, रवींद्र करंजखेले, स्वप्नीलबाबा बेंडे, रामशेठ तोडकर, प्रवीण थोरात पाटील, संदीप बाणखेले, प्रमोद बाणखेले, कल्पेशअप्पा बाणखेले, महेश ढमढेरे, सुशांत थोरात, मालती थोरात, जागृती महाजन, रूपाली घोलप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शहाजीबापू पाटील म्हणाले, आढळराव पाटील विकासकामे मंजूर करून आणण्यात आघाडीवर असतात. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर आढळराव पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही. आढळराव पाटील म्हणाले, खासदारकीच्या तिकिटासाठी जनतेची कामे करत नसून, मला जनतेत राहून काम करायला आवडते.

तिकिटाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडवणीस घेतील. महाविकास आघाडीचे सरकार असताना मतदारसंघात निधी आणण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता. अजित पवार पालकमंत्री असताना पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हता. मात्र, चंद्रकांत पाटील पालकमंत्री झाल्यापासून मतदारसंघासाठी भरघोस निधी मिळाला आहे. सूत्रसंचालन अजित चव्हाण यांनी केले. सुशांत थोरात यांनी आभार मानले.

शहाजीबापूंचे वळसे पाटील यांना आव्हान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विकासकामांच्या निधीबाबत थेट आव्हान दिले. वळसे पाटील यांनी आमदार झाल्यापासून आजतागायत या मतदारसंघासाठी जेवढा निधी आणला आहे तो सर्व निधी एकत्र करून त्याची बेरीज करा. मी गेल्या चार वर्षांत माझ्या तालुक्यासाठी आणलेल्या निधीची बेरीज करा. माझा निधी हा वळसे पाटील यांच्या निधीपेक्षा दुप्पट आहे. जर माझा निधी कमी भरला तर पुढची आमदारकी लढवणार नाही, असे आव्हान त्यांनी दिले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news