पुणे; पुढारी वृत्तसेवा : कैद्यांकडे मोबाईल सापडल्याच्या काही घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर येरवडा मध्यवर्ती कारागृहातील मोबाईलचा बेकायदा वापर थांबविण्याच्या दृष्टीने कैद्यांसाठी 30 मोबाईल बुथची व्यवस्था करून दिली जाणार आहे. येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा देण्यात येणार असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रयोग यशस्वी ठरल्यास राज्यातील सर्व कारागृहांमध्ये फोन बुथ सुरू करण्यात येणार आहेत.