वाल्हे मुक्कामी पंधराशे स्वच्छतागृहे; मुक्कामप्रमुखांची माहिती | पुढारी

वाल्हे मुक्कामी पंधराशे स्वच्छतागृहे; मुक्कामप्रमुखांची माहिती

वाल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर यादरम्यान लवकरच प्रस्थान होत आहे. सोहळ्यादरम्यान निर्मल वारीच्या उद्देशाने वैष्णवांच्या सेवेत शासनाने मोबाईल टॉयलेट देणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुषंगानेच वाल्हे मुक्कामी 1500 मोबाईल टॉयलेट ठेवणार असल्याचे वाल्हे मुक्कामप्रमुख आदेश भुजबळ यांनी सांगितले.

राज्य सरकारने ‘निर्मल वारी’ उपक्रमासाठी लाखो रुपयांची तरतूद केली आहे. उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सेवाभावी कार्यकर्ते या उपक्रमाची जनजागृती करीत असतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शनिवारी (दि. 17) वाल्हे मुक्कामी येत आहे. या ठिकाणीही 1500 स्वच्छतागृहांची व्यवस्था करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान, हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन सर्व पाँइटची पाहणी वाल्हे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास
अधिकारी राजाराम शेंडगे, वाल्हे मुक्कामप्रमुख आदेश भुजबळ, माऊली कुदळे, राजेंद्र हजगुडे, किरण बारभाई आदींनी केले. स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आदेश भुजबळ यांनी सांगितले.

पालखी सोहळ्यादरम्यान शासनाच्या माध्यमातून ’निर्मल वारी’ उपक्रम मागील सात-आठ वर्षांपासून राबवीत असून, दरवर्षी वाल्हे येथील वारी मुक्काम ठिकाणी एक हजार मोबाईल टॉयलेट शासनाच्या माध्यमातून उपलब्ध केले होते. यंदा 1500 मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून दिले आहेत. वारीतील वैष्णवांनी त्यांचाच वापर करून ‘निर्मल वारी’ उपक्रम सफल करावा; परिणामी वारीनंतर स्थानिकांना कोणतेही आजार होणार नाहीत.

– आदेश भुजबळ, मुक्कामप्रमुख

हेही वाचा

बारामतीत काँग्रेसकडून पटोलेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख

रावणगाव : स्वामी चिंचोली येथील बंधारे पाण्याने भरले

निगडी-दापोडी रस्त्यावर सुशोभीकरणासाठी सव्वाकोटीचा खर्च

Back to top button