पुणे : साखरेत घसरण, मात्र डाळी महागल्या; घ्या आजचे दर जाणून

पुणे : साखरेत घसरण, मात्र डाळी महागल्या; घ्या आजचे दर जाणून

पुणे : केंद्र सरकारने चालू महिन्याकरिता मोठा कोटा जाहीर केल्यामुळे साखरेत घसरण सुरु झाली आहे. मात्र तुटवड्यामुळे तूरडाळ, हरभराडाळ, मूगडाळ आणि उडीदडाळीच्या दरात आणखी वाढ झाली. बेसन, आटा, रवा आणि मैद्याचे दरही तेजीत असल्याचे सांगण्यात आले. भाताच्या दरवाढीमुळे पोह्यांंची दरवाढ सुरूच आहे तर खाद्यतेलांतील घसरण थांबली असून, आता दर स्थिरावले आहेत.

दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने तूर आणि उडीदडाळीच्या साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. यामुळे दरवाढीस काही प्रमाणात का होईना आळा बसेल, असा अंदाज आहे. मागणी कमी असून मुबलक पुरवठा असल्यामुळे गेले महिनाभर साखरेचे दर स्थिर होते. यापुढील काळातही फारसे सण-उत्सव नसल्यामुळे साखरेस मागणी साधारणच राहील, असा अंदाज आहे. या पार्शवभूमीवर केंद्र सरकारने जून महिन्यासाठी 23.50 लाख टनांचा साखरेचा कोटा खुला केला आहे.

हा कोटा अपेक्षेपेक्षा जास्त असल्यामुळे घोषणेनंतर दरात घसरण सुरु झाली. दरात क्विंटलमागे 25 ते 30 रुपयांनी घट झाल्याचे सांगण्यात आले. मागणी कमी राहिली तर हे दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस-30 साखरेचा प्रतिक्विंटलचा दर 3640 ते 3680 रुपये होता. आवक-जावक साधारण असल्यामुळे गेल्या आठवड्यातही सर्व प्रकारच्या गुळाच्या दरात कोणताही बदल आढळला नाही.

डाळींच्या साठ्यावर निर्बंध लागू

गेले काही दिवस तुरडाळ आणि उडीदडाळीचे दर सातत्याने वाढत आहेत. ही दरवाढ रोखण्याकरिता केंद्र सरकारने दि. 03 जूनपासून व्यापारी आणि आयातदारांवर साठा निर्बंध लागू केले आहेत. यामुळे बाजारात सुरुवातीस घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र यासाठी जे निकष लागू करण्यात आले आहेत, त्याबाबत स्पषटीकरण आल्यानंतर व्यवहार पूर्ववत सुरु झाले. मुळातच यंदा उत्पादन कमी झाल्याने बाजारात पुरवठा कमी प्रमाणात होत आहे, हे दरवाढीचे मुख्य कारण आहे. वास्तविक पाहाता, दरवाढ रोखण्याकरिता निर्बंध लागू करण्याऐवजी पुरवठा वाढविणे महत्वाचे आहे.

मागणी साधारण असली तरी उत्पादन केंद्रातच दर तेजीत असल्यामुळे गेल्या आठवडयातही तुरडाळ, उडीदडाळ आणि मुगडाळीचे दर क्विंटलमागे आणखी 200 ते 300 रुपयांनी वाढले. हरभराडाळीच्या दरातही 200 रुपयांनी वाढ झाली. यामुळे बेसन दरात 50 किलोमागे पन्नास रुपयांनी वाढ झाली. अन्य डाळी आणि कडधान्यांचे दर स्थिर होते. मिलबर गव्हाचे दर वाढल्यामुळे रवा, मैदा तसेच आटयाचे दर गेल्या आठवडयातही तेजीत होते.

भाताच्या दरवाढीमुळे पोह्यांची दरवाढ सुरुच आहे. उत्पादन केंद्रात भाताच्या दरवाढीमुळे दर कडाडले आहेत. यामुळे गेल्या आठवड्यातही पोह्यांचे दर क्विंटलमागे आणखी 100 ते 150 रुपयांनी वाढले. मुरमुरा आणि भडंगच्या दरात मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

खाद्यतेले स्थिरावली

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, पामोलिन तसेच सूर्यफूल तेलास मागणी निघाल्याने घसरण थांबल्याचे वृत्त आहे. येथील बाजारातही कमी झालेल्या दरात खरेदी सुरू झाली आहे, यामुळे घसरण थांबून आता दर स्थिरावल्याचे सांगण्यात आले. पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) : 3640 ते 3680 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर) : शेंगदाणा तेल 2700-2800, रिफाईंड तेल ः 2500-3250, सरकी तेल 1450-1700, सोयाबीन तेल 1450-1700, पामतेल 1375-1600, सूर्यफूल रिफाईंड तेल 1550-1650, वनस्पती तूप 1530-1950, खोबरेल तेल 2250 रु.

तांदूळ : गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3300, सोना मसुरी 4000-4400, एच.एम.टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000, आंबेमोहोर (सुवासिक) 7000-8000, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509- 8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु. गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1 3700-4000, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3400-3600, एम.पी. लोकवन नं.1 3600-3800, नं.2 3400-3600, सिहोर 4800-5800, सिहोरी 3400-3800, मिलबर 2700-2750 रु. ज्वारी : गावरान नं. 1- 5500-6000, गावरान नं. 2-5000-5400, नं. 3 4500-4800, दुरी 3800- 4200 रु. बाजरी :- महिको 3200-3800, गावरान 3200-3500, हायब्रीड 3000-3200 रु. गूळ : गूळ एक्स्ट्रा 4100-4200, गूळ नं. 1 3900-4050, गूळ नं. 2 3750-3850, गूळ नं.3 3650-3725, बॉक्स पॅकिंग 3800-4800 रु. डाळी :- तूरडाळ 12500-14500, हरभराडाळ 6000-6300, मूगडाळ 9500-10000, मसूरडाळ 7400- 7500, मटकीडाळ 10000-11000, उडीदडाळ 11200-11300 रु.

कडधान्ये : हरभरा 5400-5500, हुलगा – 7100-7200 चवळी 7000-9000, मसूर 6600-6800, मूग 9000-9500, मटकी गावरान 9000-9200, मटकी पॉलिश 7500-8000, मटकी गुजरात 8000- 8200, मटकी राजस्थान 8000-8200, मटकी सेलम 11500-11700, वाटाणा हिरवा 5500-6000, वाटाणा पांढरा : 5500-6000, काबुली चणा 9000-15000 रु. साबुदाणा : साबुदाणा नं. 1 : 7500, साबुदाणा नं. 2 : 7000, साबुदाणा नं. 3 6800 रु. वरई भगर : 11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1100-1200 रु. शेंगदाणा : जाडा 11700-12200, स्पॅनिश – 11500-11800, घुंगरु 10500-11000 रु. धने : गावरान 8000-8500, इंदूर 9000-12000 रु.मका लाल : 2475-2550, पिवळा लाल 2475-2550, पांढरा 3200-3300 रु. पोहे : मध्य प्रदेश 3800-4000, पेण 3800-4000, मध्यम पोहा-3500-3800, दगडी पोहा 3600- 4200, पातळ पोहा 4500-5100, सुपर पोहा 4300-4600, भाजका पोहा 525, मका पोहा 625- 675, भाजके डाळे 2750-2850, मुरमुरा (9 किलोस) 475-525, भडंग 900-950, घोटी 430, सुरती 450 रु. रवा, मैदा, आटा : (50 किलोचा भाव) आटा 1500-1550, रवा 1550-1600, मैदा 1550-1600,बेसन : (50 किलोस) 3350-3650 रु. मीठ : मीठ खडे (50 किलोस) 230, मीठ दळलेले (50 किलोस) 250 रु. मिरची : काश्मीरी ढब्बी 7000-75000, ब्याडगी 57500-60000, लवंगी तेजा 24000-25000, गुंटूर 25000-27000, खुडवा गंटूर 14000-15000, खुडवा ब्याडगी 17000- 20000 रु. नारळ : (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 1150-1250, मद्रास 2500-2600, पालकोल जुना 1400- 1450, सापसोल 2000-2500 रु.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news