बारामतीतील प्रशासकिय भवनाच्या प्रवेशद्वारातच शेतकऱ्याने घेतले पेटवून

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरातील प्रशासकीय भवनासमोर प्रवेशद्वारातच एकाने रॉकेल ओतुन पेटवुन घेतल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. ५) सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडला. त्यामुळे खळबळ उडाली. रोहिदास जनार्दन माने असे या शेतकऱ्याचे नाव आहे. संबंधित शेतकरी रेडणी (ता. इंदापुर) येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
शेतजमिनीच्या वादातुन आम्हाला न्याय न मिळाल्याची त्याची तक्रार आहे. यातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नाही. घटनेनंतर प्रांताधिकारी वैभव नावडकर, पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला शहरातील सिलव्हर जुबिली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा
नाशिक क्राईम : चोरट्यांनी पळवले चक्क एटीएम मशीन
कोहिनूर लुटल्याचे ब्रिटनकडून अखेर मान्य; कोहिनूर, हरिहर मूर्तीसह सारे परत मिळविणार भारत?