पिंपरी: सुरक्षारक्षकाचे काम अन् नातवंडांचा सांभाळ करत ‘ती’ झाली दहावी पास | पुढारी

पिंपरी: सुरक्षारक्षकाचे काम अन् नातवंडांचा सांभाळ करत ‘ती’ झाली दहावी पास

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा : पतीच्या निधनानंतर तीन मुलांची जबाबदारी पार पाडत मुलांचे शिक्षण पूर्ण केले. दोन मुलींची लग्न करून दिली. सध्या सुरक्षारक्षकाचे काम करत असून, तीन छोटी नातवंडे असताना बोर्डाची परीक्षा देऊन शोभा चौधरी या रात्रशाळेत शिकून दहावी पास झाल्या आहेत.

शोभा यांना लहानपणी शिकण्याची आवड होती. मात्र, सावत्र आईने शिकण्याच्या वयात लग्न करून दिले. तीन मुले झाल्यानंतर वयाच्या 24 व्या वर्षी त्यांच्या पतीचे निधन झाले. शोभा यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. या परिस्थितीत त्यांच्या वडिलांनी त्यांना आधार देऊन पुढे धैर्याने आलेल्या परिस्थितीला तोंड देत जगण्याचे बळ दिले. खडतर परिस्थितीत तीन मुलांचे शिक्षण पूर्ण केले. एका मुलाला व मुलीला इंजिनिअर केले, तर दुसरी मुलगी ब्युटीशियन आहे. दोन्ही मुलींची लग्न झाली असून, तीन नातवंडे आहेत.

मुलांचे कर्तव्य पार पाडल्यानंतर त्यांना शिकण्याची ओढ गप्प बसू देत नव्हती. त्यांना चिंचवड येथील रात्रशाळेविषयी कळाले. त्यांनी रात्रशाळेत प्रवेश घेतला आणि नोकरी, घर व मुले सांभाळत दहावीची परीक्षा दिली आणि यश मिळविले.

हेही वाचा:

लोणावळा : राजमाचीच्या जंगलात लुकलुकणार्‍या काजव्यांची चांदण्यांशी स्पर्धा

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या मिळकतकरात पडणार 45 कोटींची भर

पिंपरी-चिंचवड शहराला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

 

Back to top button