भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर कारखानात गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. या आरोपानंतर अजित पवार यांनी आता राज्यात किती साखर कारखान्यांची खरेदी विक्री झाली याची यादीच जाहीर केली आहे. राज्यात आतापर्यंत ६४ साखर कारखान्यांची खरेदी किंवा विक्री झाल्याची त्यांनी यादीच जाहीर केली.
कोणी उठवल २५ हजार कोटी भ्रष्टाचार झाला, अनेक चौकश्या झाल्या यात काहीच मिळाले नसल्याचे ते म्हणाले. जिल्हा बँकांनी राज्यातील वेगवेगळ्या ६ कारखाने विकले तर राज्य बँकेने ३० कारखाने विकल्याचे त्यांनी सांगितले.
सहा सहकारी साखर कारखाने जिल्हा मध्यवर्ती बँकानी विकले. सहा सहकारी साखर कारखाने राज्य सरकारच्या परवानगीने विकण्यात आले. तीन सहकारी साखर कारखाने कारखान्यांनी स्वतः विकले. बारा सहकारी साखर कारखाने भाडेकरारावर किंवा सहयोगी करारावर चावण्यास देण्यात आलेत.
महाराष्ट्रातील ६४ सहकारी साखर कारखाने विकत घेतले गेले किंवा एकाने विकत घेऊन दुसऱ्याला चालवायला दिला किंवा भाडे तत्त्वावर चालवायला दिलेत असे त्यांनी नमूद केले.
जरंडेश्वर बाबत सतत माझ्या कुटूंबाचा उल्लेख केला गेला जात आहे. मला लोकांना सांगायच की मुबंई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा बँकेने जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे थकलेले पैसे न भरल्याने कारखान्याचा ताबा घेतला. जरडेश्वर सहकारी साखर कारखाना विकत घेण्यासाठी अनेक निविदा आल्या होत्या, या कारखान्यात कुठलाही गैरव्यवहार झाला नाही असा उच्च न्यायालय आणि मुबंई उच्च न्यायालयाने म्हटलंय मी म्हणत नाही, असे ते म्हणाले.
हे ही वाचलं का?