तूर, उडीदडाळीची दरवाढ सुरूच; गहू, आटा, रवा, मैदाही महागला ! | पुढारी

तूर, उडीदडाळीची दरवाढ सुरूच; गहू, आटा, रवा, मैदाही महागला !

पुणे : तुटवड्यामुळे तूरडाळीच्या दरवाढीची आगेकूच सुरूच असून, मागणी वाढल्याने आता उडीडाळीचीही दरवाढ सुरू झाली आहे. मिलबर गव्हाच्या दरात क्विंटलमागे शंभर रुपयांनी तर आटा, रवा आणि मैदा दरात 50 किलोमागे 40 ते 50 रुपयांनी वाढ झाली. मात्र, उन्हाळी मुगाची आवक सुरू झाल्यामुळे मूग आणि मूगडाळीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. मागणी कमी असल्यामुळे शेंगदाणा तेलासह सर्वच खाद्यतेलांचे दर आणखी उतरल्याचे सांगण्यात आले. मात्र, आवक-जावक साधारण असल्यामुळे साखर, गूळ, अन्नधान्याचे दर स्थिर होते.
तुरीचा तुटवडा असून मागणी चांगली असल्यामुळे तुरडाळीचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या आठवडयातही तुरडाळीच्या दरात क्विंटलमागे आणखी तीनशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली. घाऊक बाजारातच तुरडाळीचा क्विंटलचा दर आता 12000 ते 14000 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. मुळातच तुरीचा साठा कमी असल्यामुळे दर सातत्याने वाढत असून आयातीचा फारसा परिणाम होत नाही.
पापड तयार करण्यासाठी उडीदडाळीची मागणी वाढली आहे. यामुळे उडीदडाळीच्या दरातही गेल्या आठवडयात क्विंटलमागे तीनशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली. मात्र मध्य प्रदेशातील उन्हाळी मुगाची आवक सुरु झाल्यामुळे मूग आणि मूगडाळीचे दर क्विंटलमागे 200 ते 300 रुपयांनी उतरले. अन्य सर्व डाळी आणि कडधान्याचे दर स्थिर होते.

मिलबर गहू, रवा, मैदा दरात वाढ

मागणी चांगली असून पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यामुळे गेल्या आठवडयात आटा, रवा आणि मैदा तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्या हलक्या प्रतीच्या म्हणजेच मिलबर गव्हाच्या दरात क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढ झाली. या गव्हाची विक्री प्रामुख्याने अन्न महामंडळाकडून करण्यात येतो. या गव्हाची विक्री मंदावल्यामुळे दरवाढ झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे आटा, रवा आणि मैद्याच्या दरात 50 किलोमागे चाळीस ते पन्नास रुपयांनी वाढ झाली.

साखर, गूळ स्थिर

चालू महिन्यासाठी मुबलक कोटा जाहीर झाल्यामुळे बाजारात साखरेची आवक मोठया प्रमाणात होत आहे. मात्र तुलनेने मागणी कमी आहे. यामुळे गेल्या आठवडयातही साखरेचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

साखर (प्रतिक्विंटल) 3650 ते 3700 रु.

खाद्यतेले (15 किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2700-2800, रिफाईंड तेलः 2500-3250, सरकी तेल
1450-1700, सोयाबीन तेल 1450-1700, पामतेल 1375-1600, सूर्यफूल रिफाईंड तेल 1550-1650,
वनस्पती तूप 1530-1950, खोबरेल तेल 2250 रु.
तांदूळ :- गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3300, सोनामसूरी 4000-4400, एच.एम.टी.
कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000,
आंबेमोहोर (सुवासिक) 7000-8000, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000,
बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509-
8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु.
गहू – सौराष्ट्र लोकवन नं. 1 3700-4000, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3400-3600, एम.पी.
लोकवन नं.1 3600-3800, नं.2 3400-3600, सिहोर 4800-5800, सिहोरी 3400-3800, मिलबर
2600-2650 रु.
ज्वारी :- गावरान नं. 1- 5500-6000, गावरान नं. 2-5000-5400, नं. 3 4500-4800, दूरी 3800-4200 रु.
बाजरी :- महिको 3200-3800, गावरान 3200-3500, हायब्रीड 3000-3200 रु.
गूळ :- गूळ एकस्ट्रा 4100-4200, गूळ नं. 1 3900-4050, गूळ नं. 2 3750-3850, गूळ नं.3 3650-3725, नं. 4 3500 3600, बॉक्स पॅकिंग 3800-4800 रु.
डाळी :- तूरडाळ 12000-14000, हरभराडाळ 5900-6100, मूगडाळ 9500-9700, मसूरडाळ 7400- 7500, मटकीडाळ 10000-11000, उडीदडाळ 10500-11500 रु.
कडधान्ये :- हरभरा 5400-5500, हुलगा – 7100-7200 चवळी 7000-9000, मसूर 6600-6800, मूग 9000-9500, मटकी गावरान 9000-9200, मटकी पॉलिश 7500-8000, मटकी गुजरात 8000- 8200, मटकी राजस्थान 8000-8200, मटकी सेलम 11500-11700, वाटाणा हिरवा 5500-6000, वाटाणा पांढरा 5500-6000, काबुली चणा 9000-15000 रु.
साबुदाणा :- साबुदाणा नं.1 7000, साबुदाणा नं.2 6800, साबुदाणा नं. 3 6500 रु. वरई भगर :- 11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1100-1200 रु.
शेंगदाणा :- जाडा 11700-12200, स्पॅनिश – 11700-11800, घुंगरु 10700 रु.
धने :- गावरान 8000-8500, इंदूर 9000-12000 रु. मका लाल 2475-2550, पिवळा लाल 2475-2550, पांढरा 3200-3300 रु.
पोहे :- मध्य प्रदेश 4000-4400, पेण 4000-4300, मध्यम पोहा-3800-4300, दगडी पोहा 3800-4400, पातळ पोहा 4400-5200, सुपर पोहा 4400-4700, भाजका पोहा 600-650, मका पोहा, 625-675, भाजके डाळे 2800-3200, मुरमुरा (9 किलोस) 475-525, भडंग 750-850, घोटी 450-475, सुरती 475-500 रु., रवा, मैदा, आटा – (50 किलोचा भाव) आटा 1450-1500, रवा 1500-1550, मैदा 1500-1550,
बेसन :- (50 किलोस) 3300-3600 रु.
मीठ :- मीठ खडे (50 किलोस) 230, मीठ दळलेले (50 किलोस) 250 रु.

Back to top button