पुणे ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर पहिल्या इलेक्ट्रिक शिवाई एसटी धावण्यास सुरुवात | पुढारी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर पहिल्या इलेक्ट्रिक शिवाई एसटी धावण्यास सुरुवात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे विभागाच्या एसटी ताफ्यात नव्या इलेक्ट्रिक शिवाई बस दाखल झाल्या आहेत. या बसेस आजपासून (दि.18) पुणे ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावर प्रवाश्यांसाठी धावण्यास सुरुवात झाली आहेत.

वाकडेवाडी (शिवाजीनगर) स्थानकातून पाच गाड्यांना गुरुवारी सकाळी सहा वाजता हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यानंतर या गाड्या छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने रवाना झाल्या. या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी गुरुवारी शिवाजीनगर आगाराचे वरिष्ठ व्यवस्थापक, कार्यकारी अभियंता, यांच्यासह एसटीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजीनगर ते छत्रपती संभाजीनगर अशा इलेक्ट्रिक शिवाई बस सकाळी सहा वाजल्यापासून दर एक तासाने छत्रपती संभाजी नगरसाठी धावतील. या बसची रंगसंगती ही आकर्षक असून, 45 सीटर असून नोईज पोल्युशन विरहित बस आहेत. या बस मध्ये पूर्णतः वातानुकूलित, पुश बॅक बकेट सीट, पुढील व पाठीमागील बाजूस मराठी व इंग्रजीमधून मार्ग फलक, रीडिंग लँपची सुविधा, प्रवाशांसाठी इमर्जन्सी पॅनिक बटन, एलईडी फुट लॅम्प, इनसाईड लगेज रॅक, तसेच बसच्या बाहेरील बाजूस मोठ्या बॅग व सामानासाठी प्रशस्त सामानाची डिकी, इमर्जन्सी हॅमर, प्रवाशांच्या माहितीसाठी चालक केबिन मधून आवश्यक सूचनांसाठी अनाउन्समेंट सिस्टम अशा सुविधा आहेत. या ई-शिवाई बसचे प्रवास भाडे मात्र शिवशाही प्रमाणेच असणार आहे, अशी माहिती एस टी आगाराकडून देण्यात आली आहे.

-हेही वाचा 

काय सांगता ‘शाहूवाडी’त २७ जि.प. शाळांची वीज कायमची खंडित; २१ शाळांचा तात्पुरता वीजपुरवठा बंद

कोल्हापूर : लाल मिरचीचा तोरा उतरला

काजू उत्पादक शेतकर्‍यांंचे प्रश्न सुटणार?

Back to top button