ऋषी सुनक यांच्यावरील पुस्तक ठरतेय बेस्ट सेलर; पुस्तकाची आठ दिवसांत तिसरी आवृत्ती

ऋषी सुनक यांच्यावरील पुस्तक ठरतेय बेस्ट सेलर; पुस्तकाची आठ दिवसांत तिसरी आवृत्ती
Published on
Updated on

पुणे: पुढारी वृत्तसेवा : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak)  यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर ठरत आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये २ हजार प्रतींची तिसरी आवृत्ती सुरू करण्यात आली आहे. लंडन येथे जाऊन दराडे यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुनक यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडले आहेत. या पुस्तकाला युवक युवतींकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे डिजिटल माध्यमांमुळे समोर आले आहे.

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे ऋषी सुनक (Rishi Sunak)  जावई आहेत. ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले. त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा आणि हिंदू आहे. या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच फुलून येत आहे.

एक स्थितप्रज्ञ, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, मंदिरात जाऊन पूजा करणारे गोपूजा करणारे, गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणारे ब्रिटनचे पंतप्रधान पाहून भारतीयांना त्यांचा अभिमान वाटतो आहे. आपले कर्तव्य हाच आपला धर्म आहे. हा विचार पक्का करून ते जोमाने कामाला लागले आहेत. दिवस-रात्र मेहनत करत आहेत.

काय म्‍हणाले हाेते ऋषी सुनक

मी ब्रिटिश नागरिक आहे. येथे माझे घर आहे. हा माझा देश आहे. परंतु माझा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा भारतीय आहे. माझी पत्नी भारतीय आहे. मी एक हिंदू आहे, आणि याचा मला सार्थ अभिमान आहे.

ऋषी सुनक यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या दोनच दिवसांमध्ये दोन हजार प्रतींची दुसरी आवृत्ती सुरू करण्यात आली हाेती. आता आठ दिवसात या पुस्‍तकाची तिसरी आवृत्ती आली आहे. हे पुस्तक विविध भाषांमध्ये आणण्याचाही आमचा संकल्प आहे.

– मनोज अंबिके, माय मिरर

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news