बारामती बाजार समितीवर राष्ट्रवादीचा एकहाती विजय | पुढारी

बारामती बाजार समितीवर राष्ट्रवादीचा एकहाती विजय

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रयत पॅनेलने सर्व १८ जागांवर एकहाती विजय मिळविला. भाजप मित्र पक्षाच्या शेतकरी विकास पॅनेलला या निवडणूकीत कोणताही करिश्मा दाखवता आला नाही.

भाजप – मित्रपक्षांचा पॅनेल राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे करेल असे वाटत होते, परंतु निकालानंतर त्यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याचेच स्पष्ट झाले. राष्ट्रवादीची एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली होती. उरलेल्या १७ जांगांसाठी ३४ उमेदवार रिंगणात होते. एका अपक्षाचा त्यात समावेश होता. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकहाती विजय मिळवून द्या असे आवाहन सभासदाना केले होते. सभादांनी ते खरे करुन दाखवले.

Back to top button