पुणे बाजार समिती : हमाल-मापाडी मतदार संघात शिट्टी वाजली; संतोष नांगरे मोठ्या मताधिक्याने विजयी | पुढारी

पुणे बाजार समिती : हमाल-मापाडी मतदार संघात शिट्टी वाजली; संतोष नांगरे मोठ्या मताधिक्याने विजयी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत हमाल मापाडी मतदार संघाचा पहिला निकाल जाहीर झाला आहे. संतोष नांगरे यांच्या विजयाची शिट्टी वाजली आहे. त्यांना सर्वाधिक ८८८ मते मिळाली. या मतदार संघातील अन्य पराभूत उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : राजेंद्र चोरघे ४०३, गोरख मेंगडे ३१४, संजय उंद्रे ८, गोपाळ दसवडकर ३ मते मिळाली.

या मतदार संघात 1 जागेसाठी ५ उमेदवार रिंगणात होते. एकूण २ हजार ७ पैकी १ हजार ८०२ मतदान (८९.७९ %) झाले. त्यापैकी १ हजार ६१६ मते वैध ठरली. नांगरे यांचे शिट्टी चिन्ह होते. त्यामुळे हमाल-मापाडी मतदार संघात नांगरे यांच्या विजयाची शिट्टी वाजल्याने कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

Back to top button