राज्यातील पाऊस संपला, आजपासून होणार तापमानात वाढ | पुढारी

राज्यातील पाऊस संपला, आजपासून होणार तापमानात वाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला अवकाळी पाऊस कमी होत असून, सोमवारपासून पुन्हा तापमानात वाढ होणार असल्याचे संकेत आहेत. 13 एप्रिलपर्यंत राज्यात तुरळक पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गेले तीन दिवस संपूर्ण देशासह राज्यातील बहुतांश भागांत अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली आहे.

मात्र, सोमवार, दि.10 एप्रिलपासून राज्यातील मोठा पाऊस थांबत आहे. अजूनही विदर्भ ते कर्नाटक कमी दाबाचा पट्टा असल्याने विदर्भातील काही भागांत हलका पाऊस होईल, मात्र राज्यातील कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. रविवारी राज्याच्या बहुतांश भागात पाऊस झाला. शहरात दुपारी 4 ते 6 या वेळेत वादळीवार्‍यासह पाऊस झाला. रस्त्यांना जणू ओढ्याचे स्वरूप आले होते. सायंकाळी 6 पर्यंत शहरात सरासरी 4 ते 8 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती.

हेही वाचा:

Back to top button