पुण्यात आयपीएल सामन्यांवर सट्टा घेणारा बुकी जाळ्यात | पुढारी

पुण्यात आयपीएल सामन्यांवर सट्टा घेणारा बुकी जाळ्यात

पुणे : इंडियन प्रीमियर लिगच्या (आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू या सामन्यावर सट्टा घेणार्‍या बुकीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने बेड्या ठोकल्या. येरवडा भागात ही कारवाई करण्यात आली. आकाश धरमपाल गोयल (30, रा. निंबाळकरनगर, लोहगाव) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू या सामन्यावर गोयल हा सट्टा घेत असल्याची माहिती युनिट तीनच्या पथकाला मिळाली होती.

त्यानुसार पथकाने सापळा रचून गोयल याला येरवड्यातील गुंजन टॉकीज परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने 31 मार्चपासून आयपीएलच्या मॅचेसवर सट्टा घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर, शरद वाकसे, सुजित पवार, संजीव कळंबे, राकेश टेकावडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Back to top button