खळबळजनक ! धारधार कोयत्याने सपासप वार करून युवकाचा खुन | पुढारी

खळबळजनक ! धारधार कोयत्याने सपासप वार करून युवकाचा खुन

राजगुरूनगर(ता खेड); पुढारी वृत्तसेवा : जुन्या भांडणाचा रागातून चांदुस येथे एका युवकावर ६ युवकांनी मिळुन कोयत्याने वार करून खुन केल्याची खळबळजनक घटना घडली आहे .शुभम निवृत्ती काळे (वय २० वर्षे, रा. काळेबडे वस्ती, चांदुस, ता. खेड) असे या घटनेत मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे. तर संदिप अशोक कल्हाटकर, यशराज विजय वाघमारे, सुरज गोगावले (सर्व रा. कोरेगाव ता. खेड) तसेच वैभव कोळेकर (रा. कडाची वस्ती, किवळे ता. खेड) शुभम् उर्फ सोन्या चंद्रकांत कारले, करण कारले (रा.विठ्ठलवाडी चांदुस ता. खेड) यांच्यावर खून केल्या प्रकरणावरून खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बाळासाहेब दगडू काळे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. ६ एप्रिलला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वाळुंज वस्ती येथे निसर्गश्रृष्टी प्लॉटींग जवळ चांदुस कोरेगाव रस्त्यावर ही घटना घडली. शुभम काळे याच्यावर आरोपीनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने चेह-यावर आणि हातावर धारधार हत्याराने वार केले. यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

फिर्यादी यांचा पुतण्या शुभमला राजगुरूनगर येथील सुश्रुत रुग्णालयात दाखल केले असता त्याच्यावर औषध उपचार चालु असताना तो रात्री आठ वाजता मयत झाला. पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे अधिक तपास करीत आहेत.

Back to top button