पुणे : ‘सोमेश्वर’ साखर कारखान्याच्या बगॅसला आग | पुढारी

पुणे : 'सोमेश्वर’ साखर कारखान्याच्या बगॅसला आग

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला बुधवारी (दि.२२) सायंकाळी आग लागली. आगीत जवळपास एक हजार टन बगॅस जळून खाक झाला. यामध्ये कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

वाघळवाडी प्राथमिक शाळेजवळ कारखान्याने बगॅस साठवून ठेवले आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही आग लागली. शेजारीच कारखाना असूनही कारखान्याचा अग्निशमन वाहन मात्र आग विझवण्यासाठी वेळेत पोहचू शकला नाही.

निरा येथील ज्युबलियंट कंपनीचा अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल झाली मात्र तोपर्यंत आगीत संपूर्ण बगॅस जळून खाक झाला होता.

अधिक वाचा :

Back to top button