Padma Awards 2023 : राष्ट्रपतींच्या हस्ते सुमन कल्याणपूर, कुमार मंगलम यांचा पद्म भूषण पुरस्काराने गौरव | पुढारी

Padma Awards 2023 : राष्ट्रपतींच्या हस्ते सुमन कल्याणपूर, कुमार मंगलम यांचा पद्म भूषण पुरस्काराने गौरव

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार अर्थात पद्म पुरस्कारांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी १०६ जणांना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा सोहळा राष्ट्रपती भवनामध्ये मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्यासह देशातील प्रसिद्ध उद्योगपती व आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगल बिर्ला यांचा राष्ट्रपतींनी पद्म भूषण पुरस्कार देऊन सन्मान केला. बिर्ला कुटुंबियातील कुमार मंगल हे चौथे असे व्यक्ती आहेत ज्यांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. (Padma Awards 2023)

याशिवाय माजी केंद्रीय मंत्री एस. एम. कृष्णा यांना पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री राम चंद्र मिशनचे अध्यक्ष कमलेश डी. पटेल यांना अध्यात्मिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्म भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कार वितरण समारंभावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (Padma Awards 2023)


अधिक वाचा :

Back to top button