वाल्हेकरवाडीत 70 हजारांची घरफोडी | पुढारी

वाल्हेकरवाडीत 70 हजारांची घरफोडी

पिंपरी : दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 70 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 19) सायंकाळी सव्वापाच सुमारास घडली. मल्लिकार्जुन शिवदास भंगे (32, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भंगे यांचे घर कुलूप लाऊन बंद असताना अज्ञातांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातून 50 हजारांचे सोन्या- चांदीचे दागिने आणि 20 हजार रुपये रोख रक्कम चोरट्याने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चिंचवड पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button