पुणे : मासळी, अंडी महाग ; अंड्याचे भाव शेकड्यामागे वधारले | पुढारी

पुणे : मासळी, अंडी महाग ; अंड्याचे भाव शेकड्यामागे वधारले

पुणे : देशाच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरून मासळी गणेश पेठेतील मासळीबाजारात दाखल होत आहे. उन्हाचा कडाक्यामुळे व्यापारी वर्गाकडून कमी प्रमाणात माल मागविण्यात येत आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने सर्व प्रकारच्या मासळींच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. याखेरीज, इंग्लिश अंड्याचेही भाव शेकड्यामागे पाच रुपयांनी वधारले आहे. गावरान अंडी, मटण व चिकनचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

बाजारात रविवारी (दि. 19) खोल समुद्रातील मासळीची 10 ते 15 टन, खाडीची 100 ते 200 किलो, तर नदीच्या मासळीची 500-700 किलो इतकी आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : 1600-1800, मोठे : 1600-1800, मध्यम : 1200-1400, लहान : 1000-1100, भिला : 700-800, हलवा : 750-800, सुरमई : 800-900, रावस : 700-800, घोळ : 900, करली : 360-400, करंदी (सोललेली) : 400-440, भिंग : 400-440, पाला : 1000-1400, वाम : काळी 400-440 पिवळी 400-1000, ओले बोंबील : 320-360. कोळंबी : लहान 240-320, मोठी : 480-650, जंबोप्रॉन्स : 1400, किंगप्रॉन्स : 750, लॉबस्टर : 1600-1800, मोरी : 360-400, मांदेली : 100-140, राणीमासा : 180-200, खेकडे : 320-360, चिंबोर्या : 700-750. खाडीची मासळी : सौंदाळे : 240-280, खापी : 200-240, नगली : 360-400, तांबोशी : 480-550, पालू : 20-240, लेपा : 200-240, बांगडा : लहान 100-120 मोठा 140-160, शेवटे : 240-280, पेडवी : 100-120, बेळुंजी : 140-160, खुबे : 100-120, तिसर्या : 240-300 तारली : 140-160. नदीतील मासळी : रहू : 160-200, कतला : 160-200, मरळ : 400-440, शिवडा : 240-280, खवली : 280-320, आम्ळी : 140-160, खेकडे : 400-440, वाम : 550-600. मटण : बोकडाचे : 700, बोलाई : 700, खिमा : 700, कलेजी : 740, चिकन : 200, लेगपीस : 250, जिवंत कोंबडी : 140, बोनलेस : 300. अंडी : गावरान (शेकडा) 920, डझन 120, प्रतिनग 10. इंग्लिश (शेकडा) 490, डझन 72, प्रतिनग 6.

Back to top button