पुणे : दुचाकी टेस्ट ड्राईव्हला घेऊन गेले अन् परत आलेच नाही

आळेफाटा (पुणे) : पुढारी वृत्तसेवा : पुणे येथील आळेफाटा येथील नाशिक रोडवर जुन्या दुचाकीचे खरेदी-विक्रीचे दुकान आहे. येथे स्कूटर विकत घेण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा संशयित दुचाकी विक्रेत्याकडून टेस्ट ड्राईव्हसाठी (एमएच १४ एचएन ७६३३) घेऊन गेले आणि परत आलेच नाही. हा खळबळजनक प्रकार रविवारी (दि. १९) दुपारी घडला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आळेफाटा येथे किशोर बयस यांचे आळेफाटा चौकापासून जवळ नाशिक रोडवर जुन्या दुचाकीचे खरेदी-विक्रीच्या दुकानात दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोघेजन जुनी दुचाकी खरेदीच्या बहाण्याने दुकानात आले. यावेळी दोघांनी तेथे उभ्या असलेल्या सर्व दुचाकी पाहिल्यानंतर एक स्कूटर पसंत केली. यावेळी इंजिन तपासणीसाठी दुचाकी टेस्ट ड्राईव्हला नेण्यासाठी चावी मागितली. यावेळी यांनी आपण कुठले विचारले असताना जवळचेच असल्याचे सांगितले. त्यावेळी यांनी तळघरात असलेल्या दुकानातून दुचाकी काढून टेस्ट ड्राईव्हला नेण्यासाठी चावी दिली.
दोघे संशयित दुचाकी टेस्ट ड्राईव्हला घेऊन गेले. मात्र बऱ्याचवेळ झाला ते परत आलेच नाही. यानंतर गाडी चोरी झालेचे लक्षात आले. त्यानंतर दुकान मालकाने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. आळेफाटा खरेदी-विक्रीचे मोठे मार्केट असून येथे यापूर्वी विक्रीसाठी उभ्या असललेल्या अनेक छोट्या-मोठ्या वाहनांची चोरी झाली आहे. त्यातील अनेक वाहनांचा अद्याप शोध लागला नाही. मात्र आता संशयित भामट्यांनी नवी शक्कल वापरून दुचाकी लंपास केली आहे. या घटनेने आळेफाटा वाहन खरेदी-विक्री व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
-हेही वाचा
Pune : पुणे लोहमार्ग पोलिसांनी घातपाताचा कट उधळला
Pune Gram Panchayat Live : बारामतीत प्रस्थापितांना मतदारांचा दे धक्का