पिंपरी : शस्त्र बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक | पुढारी

पिंपरी : शस्त्र बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक

पिंपरी : शस्त्र बाळगल्याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने एका तरुणाला अटक केली. शुक्रवारी दुपारी पिंपळे सौदागर येथील स्वराज चौकात ही कारवाई करण्यात आली. अभिषेक भगवान मोहिते (21, रा. पिंपळे सौदागर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हवालदार सुनील शिरसाट यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपळे सौदागर येथील स्वराज चौकात एकजण शस्त्र घेऊन आला असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून अभिषेक याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 250 रुपये किमतीचा एक कोयता आढळून आला.

Back to top button