पुणे : गांजा, चरस विक्रीसाठी आलेले दोघे गजाआड ; गुन्हे शाखेची कारवाई | पुढारी

पुणे : गांजा, चरस विक्रीसाठी आलेले दोघे गजाआड ; गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात गांजा, मॅफेड्रॉन, चरससह इतर अमलीपदार्थ विकण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वानवडी भागात ही कारवाई करण्यात आली. लायनल लेझली मेस्करेनस (33, रा. वानवडी), रसल ऍन्थोनी रेनॉल्ड चंदनशिव (21, रा. वानवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थविरोधी पथक दोनचे अधिकारी, कर्मचारी हद्दीत गस्तीवर होते.

या दरम्यान वानवडी भागात दोघेजण अमलीपदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमलदार साहील शेख, अझीम शेख यांना मिळाली. यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गांजा, चरस, मॅफेड्रॉन आढळून आले. त्यांच्याकडून अमलीपदार्थांसह दुचाकी, मोबाईल असा 11 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमलीपदार्थविरोधी पथक दोनचे पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, अंमलदार संतोष देशपांडे, प्रशांत बोमदंडी, संदीप जाधव, मयूर सूर्यवंशी, चेतन गायकवाड यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

 

Back to top button