Election : पुणे,खडकी कॅन्टोन्मेंट निवडणूक स्थगित | पुढारी

Election : पुणे,खडकी कॅन्टोन्मेंट निवडणूक स्थगित

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे कॅन्टोन्मेंटसह देशातील 57 कॅन्टोन्मेंटची निवडणूक जाहीर झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु केंद्रीय संरक्षण विभागाने पुढील आदेशापर्यंत निवडणूक स्थागित करण्याचे आदेश जारी केले आहेत.

पुणे, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली. निवडणूक प्रक्रिया सुरू असून उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. 20 आणि 21 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया होणार होती. त्यातच संरक्षण मंत्रालयाचे जॉईंट सेक्रेटरी यांनी पुढील आदेशापर्यंत निवडणूक स्थगित केल्याचा आदेश जारी केला आहे.

-हेही वाचा 

कोल्हापूर : म्हाळुंगेतील वेश्या व्यवसाय चालणाऱ्या फार्म हाऊसवर छापा; ३ जण ताब्यात

ठाणे : किसान सभेच्या मोर्चेकरांचा वाशिंद येथील मुक्काम वाढणार

नाशिक : नांदूरशिंगोटे येथे उद्या लोकनेते गोपीनाथ मुंडे लोकार्पण सोहळा

Back to top button