टोलनाका कायमस्वरुपी हटविण्यासाठी तळेगावात बंद यशस्वी

टोलनाका कायमस्वरुपी हटविण्यासाठी तळेगावात बंद यशस्वी
Published on
Updated on

तळेगाव स्टेशन; पुढारी वृत्तसेवा : सोमाटणे ता.मावळ येथील टोलनाका हटाव कृती समिती मावळच्या वतीने सोमाटणे टोलनाका कायमस्वरुपी हटविण्यासाठी गुरुवारी(दि.०९) पुकारण्यात आलेल्या तळेगाव दाभाडे बंदला गाव आणि स्टेशन भागात उत्तम प्रतिसाद मिळाला. बंदच्या माध्यमातून छोट्या, मोठ्या व्यावसायीकांनी, नागरिकांनी, व्यापा-यांनी सोमाटणे टोलनाक्याविरोधात रोष व्यक्त केला आहे.

तसेच गोडुंब्रे, वराळे, गहुंजे, तुंग, जांभुळ, कोथुर्णे ग्रामपंचायतींनी बंदला जाहिर पाठिंबा व्यक्त केला आहे. बंद कडकडीत असुन शहरात आणि स्टेशन परिसरात शूकशूकाट होता रुग्णालये, मेडीकल दुकाने, वीज वितरण, दुध वितरण आदी अत्यावश्यक सेवा चालु होत्या. बँका, पेट्रोल पंपावर, सरकारी कार्यालयात तुरळक गर्दी दिसून येत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news