वेल्हे तालुक्यात गोळीबार; एकाचा मृत्यू | पुढारी

वेल्हे तालुक्यात गोळीबार; एकाचा मृत्यू

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तोरणा गडाच्या पायथ्याला असलेल्या वेल्हे तालुक्यात सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास गोळीबार झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवनाथ रेणूसे (गाव पाबे, रामवाडी ) हे तालुक्याच्या ठिकाणी आले असता, त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला, आणि दुचाकी वरून पळून गेले. या संदर्भातील तपास आणि आरोपींचा शोध वेल्हा पोलिस घेत आहेत.

Back to top button