पिंपरी : शिवसेनेच्या आठ पदाधिकार्‍यांची हकालपट्टी | पुढारी

पिंपरी : शिवसेनेच्या आठ पदाधिकार्‍यांची हकालपट्टी

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे नाना काटे हे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा आहे. असे असताना नाना काटे यांच्या विरोधात प्रचार करणार्‍या आठ पदाधिकार्‍यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसे पत्र जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार व शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले यांनी सोमवारी (दि. 20) प्रसिद्धीस दिले आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या विरोधात प्रचार करत असल्याने चिंचवड विधानसभेच्या महिला संघटिका अनिता तुतारे, शहर संघटिका रजनी वाघ, विभाग संघटिका शिल्पा आनपान, उपशहरप्रमुख नवनाथ तरस, विभागप्रमुख प्रशांत तरवटे, विभागप्रमुख हनुमंत पिसाळ, पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर, रवी घटकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Back to top button