पुणे : अंतिम प्रारूप यादीत 4562 मतदार

पुणे : अंतिम प्रारूप यादीत 4562 मतदार

खडकी : पुढारी वृत्तसेवा :  खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने अंतिम प्रारूप यादी प्रकाशित करण्यात आली आहे. यादीत 4 हजार 562 जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत, तर 1 हजार 856 मतदारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
बोर्ड प्रशासनाच्या वतीने प्रारूप मतदारयादी तयार करण्यात आली होती.

प्रारूप मतदारयादीत 22 हजार 756 मतदारांची नोंद करण्यात आली होती. मतदारयादीमध्ये नोंद करण्यासाठी 6 हजार 418 नागरिकांनी अर्ज केले होते. 16 मार्च रोजी मंजूर झालेल्या अर्जावर कोणी हरकती/आक्षेप घेतल्यास सुनावणी होणार आहे. त्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष डी. जी. पटवर्धन यांच्या आदेशानुसार अंतिम मतदारयादीमध्ये मतदारांची नोंद होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news