असा प्रकार राजकीय संस्कृतीला धरून नाही; आ. सुनील शेळके यांची भाजपवर टीका

असा प्रकार राजकीय संस्कृतीला धरून नाही; आ. सुनील शेळके यांची भाजपवर टीका
Published on
Updated on

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : भाजपने आमदार लक्ष्मण जगताप हे हयात असताना व प्रकृतीशी झुंज देत असताना चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. अशा प्रकारचे राजकारण करणे हे राजकीय संस्कृतीला धरून नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक आमदार सुनील शेळके यांनी
भाजपवर केली. राष्ट्रवादी काँग्रेसची मासिक बैठक पिंपळे गुरव येथे एका हॉलमध्ये सोमवारी (दि.30) झाली.

या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीत शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, वर्षा जगताप, भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, मयूर कलाटे, पंकज भालेकर, राजेंद्र जगताप, राजू लोखंडे व पदाधिकारी उपस्थित होते.

आ. शेळके म्हणाले की, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शहराचा कायापालट केला. त्यामुळे राष्ट्रवादीला मानणारा मतदार मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीलाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तरीही आघाडीतील वरिष्ठ नेते अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

अजित गव्हाणे म्हणाले की, येत्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे. चिंचवड निवडणुकीत देखील विजय मिळवायचा आहे. विनायक रणसुभे यांनी प्रास्ताविक केले. दीपक साकोरे यांनी सूत्रसंचालन केले. विनोद नढे यांनी आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news