जिरेगाव हद्दीत खून; कारण अद्याप अस्पष्ट

जिरेगाव हद्दीत खून; कारण अद्याप अस्पष्ट
कुरकुंभ(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील जिरेगाव हद्दीत खून झालेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. हा खून नेमका कोणी, कुठे, कशासाठी केला हे तपासातून पुढे येईल. खून झालेला तरूण हा बारामती येथील असल्याची चर्चा आहे. रविवारी (दि.२९) सकाळी जिरेगाव भोळोबावाडी रस्त्यालगत हा प्रकार उघडकीस आला आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. जिरेगाव हद्दीत यापूर्वी असे अनेक प्रकार घडले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news