उपचारावेळी अक्षम्य हलगर्जीपणा: पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमधील डॉक्टरांविरूद्ध गुन्हा दाखल

उपचारावेळी अक्षम्य हलगर्जीपणा: पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमधील डॉक्टरांविरूद्ध गुन्हा दाखल
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: अपघातात जखमी झालेल्या रूग्णावर उपचार करताना हलगर्जीपणा केल्याप्रकरणी बुधराणी हॉस्पिटलमधील डॉक्टरांविरूद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अ‍ॅड. सुरेश सारवान यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हिरालाल सारवान (वय ७०, रा. दौंड,पुणे) हे अपघातात जखमी झाल्याने त्यांना बुधराणी रुग्णालयात दाखल केले होते. दुचाकीस्वाराने धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला इजा झाली होती. त्यानंतर त्यांना इनलॅक्स अँड बुधराणी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हिरालाल यांच्या डोक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, रूग्णालय प्रशासनाकडून मुलगा अ‍ॅड. सुरेश सारवान यांना भेटू देण्यात आले नाही. शस्त्रक्रियेनंतर दुसर्‍या दिवशी ते वडिलांना भेटले तेव्हा त्यांच्या पोटावरती गंभीर स्वरूपाच्या इजा झाली होती. पोटावर आणि गुप्तांगावर भाजल्यासारखे वाटल्यामुळे त्यांनी डॉक्टरांकडे विचारपूस केली. त्यावेळी डॉक्टरांनी उडवा उडवीची उत्तरे देत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अ‍ॅड. सुरेश सारवान यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. रुग्णावर चुकीचे उपचार केल्याने त्यांची प्रकृती आणखी गंभीर झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलीस उपनिरीक्षक नाईक तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news