पुणे : पुढारी वृत्तसेवा : टास्क व पार्टटाइम जॉबच्या बहाण्याने दाखल झालेल्या तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत तब्बल 42 लाख 50 हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पहिल्या गुन्ह्यात सोनिया नायर (40, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत त्यांची 23 लाख 33 हजारांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. नायर यांना व्हॉट्सअॅप, टेलीग्रामद्वारे सायबर चोरट्यांनी संपर्क साधून टास्क जॉब असल्याचे सांगितले. त्यांना वेगवेगळे टास्क देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीकडून 23 लाख 33 हजार रुपये स्वीकारून पैसे परत न देता फसवणूक केली.
दुसर्या गुन्ह्यात प्रेरणा कुमारी (रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांना सायबर चोरट्यांनी टास्क पूर्ण करण्याचे काम देऊन त्या आधारे वेगवेगळ्या खात्यात तब्बल 12 लाख 20 हजार भरण्यास सांगितले. मात्र, त्यांना परतावा दिला नाही म्हणून त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत फिर्याद दिली. तिसर्या गुन्ह्यात शरद भानुदास चव्हाण (31, रा. आंबेगाव बुद्रुक) यांना एका डिजिटल मार्केटिंग कंपनीची ओळख दाखवली. त्यांच्याबरोबर वेळोवेळी टेलीग्राम आयडीवरून संपर्क साधून टास्क पूर्ण करण्यास सांगितले. त्यांच्याकडून 6 लाख 97 हजार रुपये स्वीकारून फसवणूक केली.
हेही वाचा :