पिंपरी : थंडी पळाली, उकाड्यात वाढ | पुढारी

पिंपरी : थंडी पळाली, उकाड्यात वाढ

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा  पिंपरी चिंचवड शहरामध्ये तापमानात चढउतार होत आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांत थंडी गायब झाली असून उकाड्यात वाढ झाली आहे. शहराचे शनिवारी (दि.17) रोजी कमाल तापमान 32 अंश तर किमान तापमान 21. 8 अंश इतके नोंदविले गेले आहे.  मध्यंतरी झालेल्या पावसामुळे वातावरणास कलाटणी मिळाल्याने दोन ते तीन दिवस ढगाळलेले वातावरण होते. यामध्ये तापमानात वाढ होऊन सध्या उकाड्याचा अनुभव येत आहे.

Back to top button