कुसेगावला जुळ्या कालवडींना जन्म

कुसेगावला जुळ्या कालवडींना जन्म

पाटस (ता.दौंड); पुढारी वृतसेवा : कुसेगाव शितोळेवस्ती येथील शेतकरी दिपक बाळासाहेब शितोळे यांच्या सहा वर्षाच्या गायीने जुळ्या कालवडींना जन्म दिल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कुसेगाव भागात पहिल्यांदाच ही घटना घडली असून कालवडी पाहण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करत आहेत.

दिपक शितोळे हे शेतीला जोड धंदा म्हणून दूध व्यवसाय करतात. तिसर्‍या वेताच्या सहा वर्षीय गायीने रविवारी (दि.10) दुपारी बाराच्या दरम्यान दोन कालवडींना जन्म दिला. दोन वासरांना दररोज तीन लिटर दुध पिण्यासाठी लागत असताना त्यांची गाय 25 लिटर दुध दररोज देत असल्याची माहिती शितोळे यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news