चंद्रकांत पाटलांवर शाईफेक: पोलिस चौकीसमोर भाजप -समता सैनिकदल आमने सामने | पुढारी

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक: पोलिस चौकीसमोर भाजप -समता सैनिकदल आमने सामने

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्यानंतर पोलिसांनी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान समता सैनिक दल आणि भाजपाचे कार्यकर्ते पोलिस चौकीसमोर आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला होता.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, चंद्रकांत पाटील हे शनिवार १० डिसेंबर रोजी सायंकाळी चिंचवड येथील एका पदाधिकाऱ्याच्या घरी आले होते. त्यावेळी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर शाई फेकली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना चौकीत आणल्यानंतर समता सैनिक दल आणि भाजपाचे कार्यकर्तेही तेथे जमा झाले. दोन्ही गट आमने-सामने आल्याने दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद झाला. पोलिसांनी ही परिस्थिती हाताळत वाद मिटवला. दरम्यान काही काळ चिंचवड पोलीस चौकी समोर तणावाचे वातावरण तयार झाले होते.

Back to top button