पुणे : कामाचे पैसे आणायला गेला तो परतलाच नाही... | पुढारी

पुणे : कामाचे पैसे आणायला गेला तो परतलाच नाही...

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ऑनलाइन केलेल्या कामाचे पैसे आणण्याठी विमानाने हैदराबादला जाण्यासाठी गेलेला सतरा वर्षांचा मुलगा अद्याप घरी परतला नसल्याने त्याच्या घरच्यांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार विमानतळ पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यास्मीन युसूफ खान (60, रा. कलवड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाइन केलेल्या कामाचे पैसे आणण्यासाठी 6 ऑक्टोबर रोजी रात्री पुणे विमानतळावरून तो हैदराबाद येथे जाणार होता. याच दरम्यान तो बेपत्ता झाल्याबाबत तक्रार नोंद करण्यात आली असून विमानतळ पोलिस याचा तपास करत आहेत.

Back to top button