पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडून दाम्पत्याची ५ कोटी २५ लाखांची फसवणूक | पुढारी

पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडून दाम्पत्याची ५ कोटी २५ लाखांची फसवणूक

तळेगाव ढमढेरे, पुढारी वृत्तसेवा :  बांधकाम व्यवहारामध्ये बांधकाम व्यावसायिक व कर्ज देणाऱ्या बँकेचा मॅनेजर यांच्याकडून जमीन मालकाची कोट्यवधीची रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत बाबासाहेब जासूद व हेमलता जासूद यांच्या तक्रारीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक सुभाष श्रीहरी दहिफळे (रा. विमान नगर, पुणे) आणि तात्कालीन कर्ज देणार बँक मॅनेजर तनवीर जेनुद्दीन मोमीन (रा. मांजरी हडपसर, पुणे) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नेरो रियल्टीचे भागीदार व्यावसाईक बाबासाहेब जासूद व हेमलता जासूद (रा. विमान नगर पुणे) यांची स्व:संपूर्ण क्षेत्र विकसित करून त्यावर रहिवासी  इमारत बांधकाम करण्यासाठी कुबेर प्रॉपर्टीचे मालक सुभाष दहिफळे आणि तनवीर मोमीन यांच्यामध्ये करार झाला.

त्याबाबत दुय्यम निबंधक कार्यालय तळेगाव ढमढेरे येथे २ फेब्रुवारी २०१७ रोजी करारनामा रजिस्टर करण्यात आला. त्यामध्ये झालेल्या सर्व बांधकाम विक्रीमध्ये ७० टक्के संशयित कुबेर याने आणि ३० टक्के बांधकाम विक्री नेरो रियल्टीने करायचे ठरवले होते. या बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेऊन सर्व बांधकाम ३६ महिन्यात आरोपी यांनी पूर्ण करायचे, असे अटी व शर्ती करारनाम्यात नमूद करण्यात आल्या होत्या.

दरम्यान फेब्रुवारी २०२० मध्ये यासाठी ५ कोटी २५ लाख कर्ज काढण्यात आले. या कर्जासाठी रहिवासी इमारत बांधकामाबाबत कोणत्याही प्रकारचे बांधकाम न करता बांधकामाचे बनावट कागदपत्र तयार करून व ते बँकेला सादर केले. तसेच बँकेचे तत्कालीन मॅनेजर यांच्याशी संगनमत करून ते कर्ज घेण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे याकरिता गहाण खत केल्यानंतर २ महिन्यात कुबेर आणि तनवीर यांनी ही रक्कम स्वतःच्या फायद्याकरता दुसरीकडे वापरली. त्यामुळे बाबासाहेब जासूद व हेमलता जासूद यांच्या तक्रारीवरून शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल खटावकर करीत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button