Gram Panchayat Election | जळगाव जिल्ह्यात अटवाडे ग्रा. पं. निवडणुकीत सरपंच पदासह सर्व जागा बिनविरोध

जळगाव पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Gram Panchayat Election) आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यात रावेर तालुक्यातील अटवाडे गावच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दहा जागेसाठी फक्त दहाच उमेदवारी अर्ज आले आहे. माजी सरपंच गणेश महाजन व जयेश कुवटे यांच्या प्रयत्नामुळे सरपंचपद व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवड झाली आहे.
जिल्हाभरात ग्रामपंचायती निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज दि. २ शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. आज अटवाडे गावच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकच उमेदवारी अर्ज आला व तर ९ ग्रामपंचायत सदस्य पदासाठीही नऊचउमेदवारी अर्ज आल्याने ही ग्रामपंचायत शेवटच्या दिवशी बिनविरोध झाली आहे. सरपंच गणेश महाजन यांच्या अथक प्रर्यत्नामुळे ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचा बहुमान मिळाला आहे. सर्वसमावेशक उमेदवारांना येथे संधी दिल्याने तसेच ग्रामस्थ एकमताने पाठीशी राहीले म्हणून ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे माजी सरपंच गणेश महाजन यांनी सांगितले.
सर्व जागा बिनविरोध
लोकनियुक्त सरपंचपदी ममता किरण कोळी तर ग्रामपंचायत सदस्यपदी आर. के. पाटील, नितीन आत्माराम धनगर, योगेश सतीष महाजन, पूनम मोहन कोळी, रेखा किशोर महाजन, कल्पना भगवान धनगर, कविता जर्नादन महाजन, वर्षा विलास पाटील, गोकुळ भावराव करवले यांचे एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने येथील सर्व जागा बिनविरोध झाल्या आहे. (Gram Panchayat Election)