राष्ट्रवादी महिला काँग्रेस राज्यपाल यांच्या विरोधात आक्रमक; विद्यापीठ चौकात निदर्शने | पुढारी

राष्ट्रवादी महिला काँग्रेस राज्यपाल यांच्या विरोधात आक्रमक; विद्यापीठ चौकात निदर्शने

पुणे : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत केलेल्या विधानानंतर राज्यभर विरोधी पक्ष आणि विविध संघटनाच्या वतीने त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आज राज्यपाल पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून राज्यपालांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस राज्यपाल यांच्या विरोधात आक्रमक झाले असून गनिमी काव्याने राष्ट्रवादी राजभवनावर आंदोलन करण्यात आले आहे. राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून काळे झेंडे दाखवत निषेध करण्यात आला आहे.

पोलिसांनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना नोटीस पाठवली होती. तसेच जगताप यांना वानवडी पोलीस ताब्यात घेण्यासाठी घरी गेले असता प्रशांत जगताप हे घरी नसून आंदोलनासाठी जगताप अज्ञात स्थळी गेले होते. पण आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने विद्यापीठ चौकात काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात आले आहे

Back to top button