पुणे : आज रंगणार ‘पुढारी’ आयोजित कॅरम स्पर्धा | पुढारी

पुणे : आज रंगणार ‘पुढारी’ आयोजित कॅरम स्पर्धा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दै. ’पुढारी’ आयोजित ’राईज अप’ महिलांच्या क्रीडा स्पर्धेच्या कॅरम स्पर्धेमध्ये महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडणार आहे. ही स्पर्धा रविवार, दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता सातारा रोडवरील अण्णा भाऊ साठे सभागृह येथे होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 9 वाजता पुण्याचे माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्या हस्ते होणार आहे. ही खुल्या आणि एकेरी गटामध्ये स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण सायंकाळी 7 वाजता कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक भारत देसडला यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेमध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ऑक्सिरीच, हेल्थ पार्टनर डॉ. ऑर्थो, अ‍ॅकॅडमिक पार्टनर सूर्यदत्ता एज्युकेशन इन्स्टिट्यूट, फायनान्शियल पार्टनर
लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी, मीडिया पार्टनर झी टॉकीज या  सर्व प्रायोजकांच्या सहकार्याने सुरू आहेत.

Back to top button