उरुळी कांचन : लुटणार्‍या 6 जणांना अटक | पुढारी

उरुळी कांचन : लुटणार्‍या 6 जणांना अटक

उरुळी कांचन; पुढारी वृत्तसेवा : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका व्यावसायिकाला हत्यारांचा धाक दाखवून सहा जणांनी 25 हजार रुपये लुटल्याचा प्रकार घडल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या प्रकरणी अजिंक्य सतीश कांचन (रा. उरुळी कांचन, ता हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात 6 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

सुमित दत्ता खवले (रा. सातववाडी, हडपसर, पुणे), करण संदीप चिकाने (रा, सातववाडी, हडपसर, पुणे), रोहन राजकुमार गायकवाड (रा. गोंधळेनगर, हडपसर पुणे), अनिकेत गुलाब गायकवाड, (रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर), समाधान वैजनाथ बाबळसुरे (रा. गोंधलेनगर, हडपसर पुणे) आणि हनुमंतसोपान हाक्के (रा. सातववाडी, हडपसर पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा मंगळवारी (दि. 22) सायंकाळी 6.30 वाजता घडला. त्यानुसार 6
जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व त्यांच्या सहकार्‍यांनी सहा आरोपींना अटक केली आहे.

Back to top button